Photo – PTI
| मुन्नार | केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मुन्नार टेकडीवर भूस्खलनाची मोठी दुर्घटना घडली आहे.
मागच्या काही दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे इडूकी जिल्ह्यातील रजमला परिसर पाण्याने वेढला गेला आहे आणि त्यातच एक डोंगर कोसळल्यामुळे यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० लोकांना यातून वाचवण्यात यश आलं आहे. या ठिकाणी ७० ते ८० लोक राहतात.
घटनास्थळी १५ रुग्णवाहिका पोहचल्या आहेत. ५ मृत लोकांना आणि १० जखमी अवस्थेतील लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय हवाई दलाला मदतीसाठी विनंती केली आहे.
भारतीय वातावरण विभागाने एक दिवसापूर्वीच इडुक्की, वायनाड आणि कोझिकोड या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला होता.