| दिल्ली | दिल्लीमधील पश्मिम विहार परिसरातील बारा वर्षाच्या मुलीवर अज्ञात ईसमाने बुधवारी बलात्कार केला होता. धारदार शस्त्राने तिच्या अंगावरती वार केले होते त्यासंदर्भातील एका आरोपीला पोलीसांनी गुरूवारी अटक केली आहे. असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. याबाबतीत अजून काही खुलासा पोलिसांकडून करण्यात आला नाही. त्याच्यावरती पोक्सो आणि हत्या केस होऊ शकते.
बुधवारी घरी कुणीही नसताना या मुलीवर अज्ञात ईसमाने बलात्कार आणि धारदार शस्त्रांनी वार केल्यानंतर पोलिसांनी पिडितेला संजय गांधी रुग्णालयात भरती केलं होतं परंतु पीडित मुलगी गंभीर असल्यामुळे तिला नंतर एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. दिल्ली महिला आयोगाने आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही याबाबतीत एम्स रुग्णालयात भेट देणार असल्याचं सांगितलं.
“या घटनेनं मी पूर्णपणे हादरुन गेलो आहे. मी डाॅक्टरांशी चर्चा केली. पुढचे 24 तास गंभीर असतील असं डांक्टराचं म्हणणं आहे. आरोपीला शक्य तेवढी मोठी शिक्षा होण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालं आहे” असंही केजरीवाल म्हणाले. मुलीच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत करण्याचंही त्यांनी जाहीर केलं.