| ता ०५ | गलवान खोऱ्यात भारत आणि चिनच्या संघर्ष सुरू असल्याने, बीसीसीआयला यंदाच्या आयपीएलसाठी Vivo कंपनी सोबतचा करार मोडावा लागला. गलवान खोऱ्यात भारत आणि चिन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात २० भारतीय जनावान शाहिद झाले होते. या घटनेनंतर देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत होती.
सोबतच बीसीसीआयने Vivo सोबतचा करार बंद करावा असा दबाव सोशल मीडिया वर वाढत होता. २०१८ ला बीसीसआय आणि Vivo कंपनी सोबत पाच वर्षाचा करार झाला होता. Vivo कंपनी ने बीसीसीआयला २१९९ कोटी रुपये दिले होते. प्रत्येक वर्षी Vivo कंपनी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती. मात्र आता Vivo कंपनी सोबतचा करार बंद संपुष्टात आल्याने नवीन स्पॉन्सर शोधावा लागणार आहे.
लवकरच नवीन स्पॉन्सर भेटतील यावर चर्चा चालू आहे अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली. कोरोनाच्या संकटामुळे यंदाचे आयपीएल सत्राला १९ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे.