| ता. ०९ |समीर शर्माने अनेक हिंदी टीव्ही मालिकेत काम केलं होत. समीर शर्माचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. वॉचमनला रात्री गस्त घालताना खिडकीतून समीर पंख्याला लटकलेला दिसल्यानंतर सोसायटीतल्या लोकांना त्याने कळवलं. समीरने याच वर्षी फेब्रुवारीमध्ये भाड्यानी फ्लॅट घेतला होता. पोलिसांना माहिती दिल्यानंतर काल रात्री ८ वाजता पोलिस घटनास्थळी पोहचले. बॉडीची अवस्था पाहता समीरने दोन ते तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
समीरने ‘कहाणी घर घर की’, ‘ये रिश्ते है प्यार के ‘, ‘ लेफ्ट राईट लेफ्ट ‘,’ज्योती ‘, ‘ गीत हुई सबसे परायी ‘ अशा अनेक हिंदी मालिकेत काम केलं होतं तसंच ‘ हंसी तो फंसी ‘ , ‘ इत्तेफाक ‘ अशा बॉलिवूड फिल्ममध्येही काम केलं होतं. समीर मूळ दिल्लीचा होता आणि शिक्षणानंतर तो बंगलोरला गेला. तिथं त्याने एड एजेंसीमध्ये काम केलं त्यानंतर अॅक्टींग साठी मुबईत येऊन अनेक मालिकांमध्ये काम केलं.
सध्या देशभरात सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येवरून वादंग सुरू आहे. यापाठोपाठ समीरच्या आत्महत्येच कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. समीरच्या अचानक जाण्याने मनोरंजन क्षेत्रातील अनेक लोकांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे.