| ता.०५ | जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची नजरकैद ३ महिन्यांनी वाढवण्यात आलीय. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली. यासोबत ‘सर्वोच्च न्यायालयात माझी याचिका सुनावणीस घेत नाही आता कोणाकडे न्याय मागणार?’ असा प्रश्न ही त्यांनी ट्विट मध्ये विचारत नाराजी व्यक्त केली आहे. मेहबूबा मुफ्ती यांचे ट्विटर अकाउंट हे स्वतः त्यांची मुलगी इल्जिता मुफ्ती या चालवतात.
दरम्यान, शुक्रवारी पीपल्स कॉन्फरन्स पार्टीचे अध्यक्ष यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली. लोन यांना पिडिपीचे युवक अध्यक्ष वहिद पारा यांच्या सोबत त्यांच्या सरकारी घरात ठेवण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याचा प्रस्ताव संसदेत ठेवण्याच्या एक दिवस आधी मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
संसदेत कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्यात कोणताही गैरप्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून या दोन्ही नेत्यांना अटक करण्यात आली होती. यासोबतच जम्मू काश्मीरला विशेष दर्जा मिळाल्यानंतर ३७ राज्यकर्त्यांना आणि ७,३५७ इतक्या लोकांना ही अटक करण्यात आली होती. व त्यांना सरकारी गेस्ट हाऊस मध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
यामध्ये सगळ्यात पहिली सुटका जम्मू कश्मीर नॅशनल कॉन्फ्रेंसचे नेते सैद मोहम्मद अखून यांची झाली होती. यानंतर नूर मोहम्मद शैख (PDP), इमरान रजा अंसारी (पीपुल्स कॉन्फ्रेंस) आणि राजा मुजफ्फर (JKPM) यांना १० ऑक्टोंबरला सोडवण्यात आले होते.