| ता. १५ | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ॲमेझॉन, इंडियामार्ट, फेमअसशॉप, मिंत्रा, स्नॅपडील, फ्लिपकार्ट या वेबसाईट्सवरून भारतीय राष्ट्रध्वजाच्या मास्कची विक्रीची विक्री करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार पाहता मास्क वापरणे आणि शारीरिक अंतर ठेवणे सक्तीचे केले आहे. परंतु स्वांतंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजाचे मास्क विकण्याचा लाजीरवाणी प्रकार या वेबसाईट्सवरून झाला आहे.
यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होत आहे. आणि अशा मास्कची विक्री थांबवण्यासाठी, यासाठी शासनाने तात्काळ कारवाई करावी असे सांगत हिंदू जनजागृती समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रध्वजाच्या होणाऱ्या अवमानाबाबत या अगोदर ही हिंदू जनजागृती समितीने २०११ मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती.
शासनाने यावर कडक कारवाई करावी सांगून राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना आणि अवमान रोखण्याचा आदेश या निर्णयमध्ये दिला होता.