| ता.१४ | चाकरमान्यांना गणेश उत्सवासाठी कोकणात जाता यावे, म्हणून कोकण रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर काळात या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. रेल्वेच्या तिकिटांचे बुकिंग 15 ऑगस्टपासून सुरू होणार असून कन्फर्म तिकीट असणाऱ्यांना प्रवास करता येणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर 82 जाणाऱ्या आणि 82 येणार्या अशा एकूण 162 गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोरोना काळात घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
या विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि लोकमान्य टिळक येथून सुटणार आहेत.
कोकण रेल्वेकडून विशेष सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. हे वेळापत्रक कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. http://www.konkanrailway.com/press/details/1063
- दिगंबर दगडे