• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Saturday, June 10, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home विज्ञान + तंत्रज्ञान

नोबेलची कथा…

by The Bhongaa
August 15, 2020
in विज्ञान + तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
A A

| ता. १२ | संपूर्ण जगात नोबेल पुरस्कार हा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. म्हणून याला जगातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून देखील मानले जाते. वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन, लेखक जेबी शॉ, विंस्टन चर्चिल, अर्नेस्ट हेमिंग्वे, दलाई लामा आणि नेल्सन मंडेला असे कित्येक विद्वान हे नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

नोबेल पुरस्कार हा सर अल्फ्रेड बनाड नोबेल या विद्वान व्यक्तीच्या नावे दिला जातो. त्यांचा जन्म हा १८३३ मध्ये स्वीडनची राजधानी स्टॉकहोम मध्ये झाला होता. पुढे वयाच्या अठराव्या वर्षी ते रसायन क्षेत्रातील उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेले.

अल्फ्रेड नोबेल यांनी १८६७ साली डाइनामाईटचा शोध लावला. नोबेल यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात तब्बल ३५५ शोध लावले आहेत. पण सर्वाधिक प्रसिद्धी आणि पैसा त्यांना डाइनामाईटच्या शोधानं मिळवून दिली. स्वीडनला परत आल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या कारखान्यामध्ये विस्फोटक खास करून नाइट्रोग्लिसरीनच्या संशोधनावर ही भर दिला.पण ३ सप्टेंबर १८६४ साली त्यांच्या कारखान्यामध्ये महाभयंकर स्फोट झाला आणि त्यामध्ये त्यांच्या धाकट्या भावासहित अन्य चार लोकांचा मृत्यू झाला. या घटनेचा खूप मोठा धक्का अल्फ्रेड नोबेल यांना बसला . तरीदेखील त्यांनी आपलं संशोधनकार्य पुढे चालूच ठेवले.

१८६७ साली नोबेल यांनी धूरविरहित स्फोटकाचा शोध लावला. पुढे जाऊन याच स्फोटकाचं कॉर्डाईटमध्ये रूपांतर झालं . या दोन्हीही स्फोटकांचा उद्योगधंद्यांमध्ये तसंच युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जाऊ लागला . या स्फोटकांच्या माध्यमातून तसंच रशियामधील बाकू येथील तेलविहिरींच्या माध्यमातून त्यांना प्रचंड प्रमाणावर पैसा मिळाला .

संबंधितबातम्या

यंदाचे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी, पहा ग्रहणाची वेळ काय असेल..

जागतिक हवामान दिन: जगातील ‘सर्वात प्रदूषित’ राजधानीच्या यादीत दिल्ली टॉपला

जंगलात झाडं खतांशिवाय वाढतात, मग हाच प्रयोग जर शेतात केला तर? जाणून घ्या सविस्तर माहिती

कांद्यामुळे आईच्या डोळ्यात पाणी! त्याने बनवला डोळ्यातलं पाणी बंद करणारा ‘स्मार्ट चाकू’

नोबेल पुरस्काराची पार्श्वभूमी

१८८८ साली एका वर्तमानपत्रानं नजरचुकीनं अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूची बातमी छापली . ‘मृत्यूच्या सौदागराचा मृत्यू ‘ अशा आशयाची ती बातमी वाचून त्यांच्या मनाला तीव्र धक्का बसला. वर्तमानपत्रांनी नोबेल यांनी लावलेल्या डाइनामाईटच्या शोधाबद्दल लिहून त्यांना हजारो लोकांच्या मृत्यूला जबाबदार म्हणून घोषित केले. ही बातमी वाचून त्यांच्या मनात विचार आला की माझ्या मृत्यूनंतर अवघं जग मला “मृत्यूचा सौदागर” याच नावानं ओळखेल.

१८९५ साली त्यांनी आपल्या मृत्युपत्रात आपल्या संपत्तीच्या सर्वात मोठ्या भागाचा ट्रस्ट बनवला जावा अशी तरतूद केली . त्यांची इच्छा होती की , या रकमेवर मिळणाऱ्या व्याजातून मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या लोकांना सन्मानित केलं जावं.१० डिसेंबर १८९६ रोजी अविवाहित असणाऱ्या नोबेल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने इटलीमध्ये निधन झाले.

पुढे नोबेल फाउंडेशनची स्थापना ही २९ जून १९०० रोजी करण्यात आली. १९०१ पासून नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पहिला नोबेल पुरस्कार हारेडक्रॉसचे संस्थापक हेन्री दुनांट आणि फ्रेंच पीस सोसायटीचे 1901 मधील पहिले नोबेल शांतता पुरस्कारत्याचे संस्थापक अध्यक्ष फ्रेडरिक पॅसी यांना देण्यात आला. तर अमर्त्य सेन हे १९९८ साली भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेता होते.

नोबेल पुरस्कार हा शांतता, साहित्य, भौतिकशास्त्र विज्ञान , रसायनशास्त्र, वैद्यकीय विज्ञान आणि अर्थशास्त्र अश्या सहा क्षेत्रांमध्ये कामगिरी करणाऱ्या लोकांना हा अत्यंत मानाने आणि प्रतिष्ठेने दिला जातो . यापैकी शांतता पुरस्काराचं वितरण ओस्लोमध्ये होतं. तर इतर सर्व पुरस्कार स्टॉकहोममध्ये दिले जातात.

Tags: nobel
ShareTweetSendShare
Previous Post

महाराष्ट्र सरकारचा गुगलसोबत मोठा करार…

Next Post

कोरोना लस संपूर्णपणे सुरक्षित आहे ?

Related Posts

यंदाचे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी, पहा ग्रहणाची वेळ काय असेल..
ताज्या बातम्या

यंदाचे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी, पहा ग्रहणाची वेळ काय असेल..

April 21, 2022
जागतिक हवामान दिन: जगातील ‘सर्वात प्रदूषित’ राजधानीच्या यादीत दिल्ली टॉपला
ताज्या बातम्या

जागतिक हवामान दिन: जगातील ‘सर्वात प्रदूषित’ राजधानीच्या यादीत दिल्ली टॉपला

March 23, 2022
जंगलात झाडं खतांशिवाय वाढतात, मग हाच प्रयोग जर शेतात केला तर? जाणून घ्या सविस्तर माहिती
ताज्या बातम्या

जंगलात झाडं खतांशिवाय वाढतात, मग हाच प्रयोग जर शेतात केला तर? जाणून घ्या सविस्तर माहिती

March 6, 2022
ताज्या बातम्या

कांद्यामुळे आईच्या डोळ्यात पाणी! त्याने बनवला डोळ्यातलं पाणी बंद करणारा ‘स्मार्ट चाकू’

March 3, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories