भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच सुरेश रैनाने देखील इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.
‘मलासुद्धा तुझ्या सोबत या प्रवासाला यायला आवडेल’, अशा आशयाची भावूक पोस्ट सुरेश रैनाने इंस्टाग्रामवर केली.
चांगली कामगिरी करून देखील बऱ्याच काळ भारतीय संघात स्थान न मिळाल्याने सुरेश रैनाने हा निर्णय घेतल्याची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली आहे.