| ता. १५ | RBI ने शुक्रवारी ५७,००० कोटी एवढा लाभांश देय केंद्र सरकारसाठी मंजूर करणार असल्याचं सांगितलं.
RBI समितीने ५७,१२८ कोटी एवढा अतिरिक्त देय सरकारला २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी दिला असल्याचं सांगितलं. ‘काॅटेंजेंसी रिस्क बफर’ ५.५ टक्क्यांवर राखून ठेवण्यासाठी एवढा निधी मंजूर करणार असल्याचंही RBI ने प्रसिद्धीपत्रकात सांगितलं आहे.
RBI केंद्रीय समितीच्या ५८४ व्या मीटिंगमध्ये गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला.
सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय बँक तसेच राज्य सरकारच्या वित्तीय संस्थाकडून ६०,००० कोटींचा लाभांश मिळण्याबाबत सांगितलं होतं. एप्रिल – जूनच्या जागतिक महामारीत झालेल्या ६.६२ लाख कोटींचा वित्तीय तोटा झाल्यामुळे हा निर्णय घेतला गेला.
RBI च्या १९३४ कायद्याअंतर्गत ‘अतिरिक्त निधीचे वाटप’ नुसार RBI ला झालेल्या नफ्याचे तपशील केंद्राला द्यावे लागतात.
- तुषार धायगुडे