सध्या व्हाट्सअपवर एक माशाचा व्हिडिओ व्हायरल होत असून, हा मासा निरा नदीत सापडला आहे, असा दावा केला जात आहे. बारामती तालुक्यात हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर अनेक लोकांनी द भोंगाकडे तो व्हिडीओ आणि सोबत करण्यात आलेला दावा खरा आहे की खोटा हे तपासण्याची पाठवला.
त्यानंतर आम्ही गुगलच्या रिव्हर्स सर्च इमेज या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर 11 ऑगस्ट 2020 ला युट्युबवर पोस्ट केलेला एक व्हिडीओ सापडला.
त्या व्हिडिओमध्ये ओडिसातील संबलपुर जिल्ह्यात असलेल्या हिराकुड धरणाचा उल्लेख केला होता. गुगलवर अजून शोध घेतल्यानंतर त्याच्या संदर्भात एक बातमी सापडली.
त्या बातमीनुसार ओडिसातील हिराकुड धरणात मासेमारी करत असताना काही मच्छिमारांना हा मासा दिसला. त्याचं वजन 1000 किलो असल्याचा दावा त्या लोकांनी केला आहे. त्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी हा मासा याच धरणातील आहे की इतर ठिकाणाहून आला आहे याचा शोध घेण्याचं आश्वासन मच्छिमारांना दिलं.
त्यामुळे व्हाट्सअपवर फिरत असलेला व्हिडिओ महाराष्ट्रातील नसून ओडीसातील आहे हे सिद्ध झालं आहे.