सध्या अमेरिकेत कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं आहे. वॉशिंग्टन हाऊसमध्ये या संदर्भात पत्रकार परिषद चालू होती. या पत्रकार परिषदेत शिरीश दाते या भारतीय वंशाच्या पत्रकारांने डोनाल्ड ट्रम्प यांना असा प्रश्न विचारला की त्याची बोलतीच बंद झाली. शिरीश दाते डोनाल्ड ट्रम्प यांना म्हणाले, ‘साडेतीन वर्षापासून तुम्ही अमेरिकन जनतेला जे खोटं बोलत आहेत, त्याबद्दल तुम्हाला पश्चाताप होतो का?’ असा अनपेक्षित प्रश्न ऐकल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची जणू वाचाच बसली.
सुरुवातीला त्यांनी प्रश्न ऐकू न आल्यासारखं केलं. त्यांनी दाते यांना पुन्हा प्रश्न विचारण्यास सांगितले. त्यानंतर दाते यांनी परत तोच प्रश्न विचारला. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावर काही सेकंद विचार केला आणि पुढचा प्रश्न घेतला. शिरीश दाते यांचा प्रश्न आणि डोनाल्ड ट्रम्प यांची शांतता काही वेळातच ट्विटरवर प्रचंड व्हायरल झालेली आहे. दाते सध्या हफपोस्टचे प्रतिनिधी असून ते व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते.
मी पाच वर्षांपासून हा प्रश्न विचारण्याची वाट बघत होतो अशी प्रतिक्रिया दाते यांनी दिली.
वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जुलै महिन्याअखेरीस वीस हजारांपेक्षा जास्त खोटे दावे केले आहेत. शिरीश दाते हे पुण्यामध्ये जन्मलेले भारतीय-अमेरिकन वंशाचे नागरिक आहेत. ते सध्या हफपोस्टसाठी काम करत आहेत.
दिगंबर दगडे