सध्या सोशल मीडियावर सर्वोच्च न्यायालयाचं घोषवाक्य बदलण्याची पोस्ट व्हायरल होत आहे. पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचं घोषवाक्य सत्यमेव जयते असं होतं. त्यानंतर भाजप सरकारने यतो धर्मस्ततो जयः असं नवीन घोषवाक्य केलेलं आहे, असा दावा सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
लोकांमध्ये जास्त गैरसमज पसरू नये म्हणून आम्ही या पोस्टची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटचा वापर करण्यात आला. या वेबसाईटवर सर्वोच्च न्यायालयाचा अधिकृत लोगो मिळाला. त्यात सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीद वाक्य यतो धर्मस्ततो जयः हेच दिसून आलं.
त्याचबरोबर घोषवाक्य बदलण्याची बातमी खरी आहे का? हे पाहण्यासाठी आम्ही मोठ्या न्यूज पोर्टलचा आधार घेतला. त्या वरही या संबंधी कोणतीही बातमी नव्हती. त्यामुळे सोशल मीडियावरील पोस्टमध्ये जो दावा करण्यात येत आहे, तो पूर्णपणे खोटा आहे.
सर्वोच्च न्यायालयाचं बोधवाक्य: यतो धर्मस्ततो जयः
यतो धर्मस्ततो जयः हे सर्वोच्च न्यायालयाचं बोधवाक्य असून ‘जिथे सत्यता आहे, तिथे विजय आहे’ असा याचा अर्थ आहे.
भारताच राष्ट्रीय ब्रीदवाक्य: सत्यमेव जयते
‘सत्यमेव जयते’ भारताचं राष्ट्रीय ब्रीदवाक्य असून देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी या वाक्याचा राष्ट्रीय ब्रीदवाक्य म्हणून स्वीकार करण्यात आला. हे वाक्य मूळचं मुंदका उपनिषद या हिंदू साहित्यातील आहे.
जेष्ठ पत्रकार पुण्य प्रसून वाजपेयी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीद वाक्य बदलल्याचा ट्विट केलं होतं. यामुळे गोंधळ निर्माण झाला. प्रसुन वाजपेयींना ट्विटरवर 21 लाखांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.
आपने सही कहा…
हाई कोर्ट और भारत सरकार के चिन्ह में सत्यमेव जयते का ज़िक्र है… सुप्रीम कोर्ट में पहले से
।।यतो धर्मस्ततो जय: ।। का ज़िक्र है ।
खेद के साथ आपका शुक्रिया । https://t.co/KL0l2zgkch— punya prasun bajpai (@ppbajpai) August 21, 2020
- दिगंबर दगडे