आंध्र प्रदेश-तेलंगणा सीमेवर भुमिगत असलेल्या श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पामध्ये गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत ९ लोक अडकले होते. मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या धुरामुळे मदतकार्यातही अडचण येत आहे. असं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. यात अडकलेल्या सर्व कामगारांचा मृत्यू झालेला असुन सगळे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत.
मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मृत इंजिनिअर श्रीनिवास गौड यांच्या परिवाराला ५० लाख रुपये आणि बाकी ८ कर्मचाऱ्यांच्या परिवारासाठी प्रत्येकी २५-२५ लाख रुपये देण्याचे घोषित केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक नोकरी देण्याचंही आश्वासन दिलं आहे.
नगरकर्नूल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एल शर्मन यांनी सांगितलेलंं की, विद्युत प्रकल्पाच्या आवारात लागलेली आग विझवण्यासाठी सुरुवातीला अग्निशमन दलाचे ३ लोक प्रयत्न करत होते. पण खूप धूर झाल्यामुळे बचावकार्यात अडचण येत होती. मात्र रात्री ११ पर्यंत संपूर्ण आग विझल्यावर मदतकार्य सुरू करण्यात आलं. संपुर्ण आग विझल्यानंतर जलविद्युत प्रकल्पातून सगळे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, नेवेली तामिळनाडू मध्ये जलविद्युत केंद्रामध्ये देखील बॉयलर फुटून ५ लोकांचा मृत्यू होऊन १६ लोक जखमी झाले होते.
- तुषार धायगुडे