AAYUSH चे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी ऑनलाईन ट्रेनिंग सत्रादरम्यान ‘ज्यांना हिंदी येत नाही, ते मीटिंग सोडून जाऊ शकतात कारण मला इंग्रजी येत नाही’, असं विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ माजली. तामिळनाडूतील नेत्यांनी या विधानाचा निषेध केला.
द्रमुकच्या खासदार कानिमोझी यांनी कोटेचा यांना निलंबित करा तसेच त्यांच्यावर शिस्तभंग केल्याची कारवाई करण्याची मागणी केली. ‘ आमच्यावर हिंदीचे वर्चस्व लादले जात आहे’, असंही ट्विट त्यांनी केलं आहे. ‘हिंदी सोडून इतर भाषिकांनी असं किती दिवस सहन करायचं’? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
लोकसभेचे खासदार कार्ती चिंदबरम यांनीदेखील ‘हिंदी भाषेचा आग्रह धरणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे’, अशी प्रतिक्रिया दिली.
कानिमोझी या एक तमिळ कवयित्री, पत्रकार आणि राजकीय नेत्या आहेत. त्या राज्यसभेमध्ये संसद सदस्या म्हणुन तामिळनाडूचे नेतृत्व करतात.
- तुषार धायगुडे