तेलंगणाच्या पंजगुट्टा पोलीस ठाण्यात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महीलेचं सासरच्या लोकांकडुन लैंगिक शोषण होत होते. या विरोधात महीलेने १३९ लोकांविरोधात तक्रार केली आहे.
जून २००९ मध्ये या महिलेचा विवाह झाला होता. पण विवाहाच्या तीन महिन्यानंतर तिच्यावर लैंगिक आणि शारीरिक अत्याचारास सुरु झाला होती. यामुळे डिसेंबर २०१० मध्ये तिचा घटस्फोट झाला होता.
घटस्फोटानंतर ही महिला पुढील शिक्षणासाठी गेली. पण त्यानंतर देखील तिला काही वर्षातच धमक्या यायला लागल्या आणि सासरच्या लोकांकडून शोषण केलं गेलं. पण आरोपींच्या भीतीमुळे तक्रार केली नसल्याचे तिने सांगितले.
पुढील तपास चालू आहे अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
- पवन अंबुरे