देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या घरात मोरासोबत काढलेली छायाचित्रे व्हायरल होत आहेत. मोदींनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकौंटवरून मोरासोबतचा व्हिडीओ शेअर केलाय.
भोर भयो, बिन शोर,
मन मोर, भयो विभोर,
रग-रग है रंगा, नीला भूरा श्याम सुहाना,
मनमोहक, मोर निराला।रंग है, पर राग नहीं,
विराग का विश्वास यही,
न चाह, न वाह, न आह,
गूँजे घर-घर आज भी गान,
जिये तो मुरली के साथ
जाये तो मुरलीधर के ताज। pic.twitter.com/Dm0Ie9bMvF— Narendra Modi (@narendramodi) August 23, 2020
पण बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर मोर पाळल्यामुळे कारवाई करण्यात आली होती. 2017 साली लालुप्रसाद यादवांवर वन्यजीव कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. यामध्ये त्यांच्या घरातील दोन मोर प्राणी संग्रहालयात सोडण्यात आले होते.
वन्यजीव कायदा – 1972 नुसार मोर पाळणं हा कायद्याने गुन्हा मानला जातो. पण देशाच्या पंतप्रधानांनीच हा कायदा मोडलाय. यामुळं लालूप्रसाद यादवांवर जशी कारवाई झाली तशी मोदींवर होणार का असा प्रश्न देशभरातून विचारला जातोय.