• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Thursday, June 30, 2022
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home विज्ञान + तंत्रज्ञान

जागतिक तापमान वाढीमुळे कॅलिफोर्नियातील जंगलांना आग

by The Bhongaa
August 25, 2020
in विज्ञान + तंत्रज्ञान
A A

सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी जंगलांना आग लागली असून आतापर्यंत 11 लाख एकर जमीन आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. कॅलिफोर्नियात जंगलांना आग लागणं ही नवीन गोष्ट नाही. मात्र सध्याची आग लागण्यात क्लायमेट चेंज अर्थात जागतिक तापमान वाढीमुळे वातावरणात होणारा बदल जबाबदार असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

प्रचंड उष्णता, विजांचा कडकडाट आणि कोरोना संकट यामुळे कॅलिफोर्नियातील आग जास्तच भडकत आहे.

या आगीच्या झळा कॅलिफोर्नियाच्या किनारी भागात देखील पसरल्या असून जगप्रसिद्ध अशा रेडवूड जातीच्या झाडांना धोका निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी या राज्यात विजेच्या कडकडाटासह मोठं वादळ आलं होतं. सध्या कॅलिफोर्नियात उन्हाळा चालू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सुकलेले गवत उपलब्ध आहे. जेव्हा वादळ आलं होतं तेव्हा तीन दिवसात 11 हजारांपेक्षा जास्त विजा जमिनीवर कोसळल्या, त्यामुळे अनेक ठिकाणी आग लागली.

संबंधितबातम्या

यंदाचे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी, पहा ग्रहणाची वेळ काय असेल..

जागतिक हवामान दिन: जगातील ‘सर्वात प्रदूषित’ राजधानीच्या यादीत दिल्ली टॉपला

जंगलात झाडं खतांशिवाय वाढतात, मग हाच प्रयोग जर शेतात केला तर? जाणून घ्या सविस्तर माहिती

कांद्यामुळे आईच्या डोळ्यात पाणी! त्याने बनवला डोळ्यातलं पाणी बंद करणारा ‘स्मार्ट चाकू’

कॅलिफोर्निया राज्याला जागतिक तापमानाचे परिणाम जाणवू लागले आहेत. येथील हवामानात स्थिरता राहिली नाही. 2020 मध्ये फेब्रुवारी महिना कॅलिफोर्नियातील लोकांसाठी  सगळ्यात जास्त कोरडा ठरला. त्यानंतर राज्याच्या उत्तर आणि पूर्वेकडच्या भागात उष्णतेच्या लाटा आल्या. त्या भागाचे तापमान सतत वाढत असल्याने राज्यातील जंगलं, गवताळ प्रदेश सुकू लागली आहेत.

कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅले नॅशनल पार्क येथे 54.4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. हे तापमान पृथ्वीवरील आतापर्यंतच सर्वात जास्त तापमान आहे.

खरंतर कॅलिफोर्नियात जंगलांना आग लागणं नवीन गोष्ट नाही. उलट आग लागल्यानंतर त्याच्या राखेतून वेगवेगळी पोषक तत्व झाडांना मिळत असतात. त्यामुळे जंगलांना आग लागणं हा येथील पर्यावरण संस्थेचा भाग आहे. मात्र यावर्षीच्या आगीत ज्या ठिकाणी सहसा आग लागत नाही, अशा ठिकाणी देखील ही आग पसरली आहे.

या संकटामुळे 18 ऑगस्टला कॅलिफोर्नियात आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली. सध्या या राज्यात कडक उन्हाळा आहे आणि तापमान देखील नेहमीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे देखील आग वाढत आहे. त्याचबरोबर वीज पडल्याने देखील वेगवेगळ्या ठिकाणी आग लागत आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू असून सध्याच्या परिस्थितीला अग्निशामन दलाचे  बारा हजार कर्मचारी आग विझवण्यासाठीचे  प्रयत्न करत आहेत.

Tags: bhongaacaliforniaआगकॅलिफोर्नियाजंगलभोंगा
ShareTweetSendShare
Previous Post

थायलंड सरकारने का केले १० लाख नागरिकांचे फेसबुक अकाऊंट ब्लॉक ?

Next Post

सावित्रीची गाथा – २

Related Posts

यंदाचे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी, पहा ग्रहणाची वेळ काय असेल..
ताज्या बातम्या

यंदाचे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी, पहा ग्रहणाची वेळ काय असेल..

April 21, 2022
जागतिक हवामान दिन: जगातील ‘सर्वात प्रदूषित’ राजधानीच्या यादीत दिल्ली टॉपला
ताज्या बातम्या

जागतिक हवामान दिन: जगातील ‘सर्वात प्रदूषित’ राजधानीच्या यादीत दिल्ली टॉपला

March 23, 2022
जंगलात झाडं खतांशिवाय वाढतात, मग हाच प्रयोग जर शेतात केला तर? जाणून घ्या सविस्तर माहिती
ताज्या बातम्या

जंगलात झाडं खतांशिवाय वाढतात, मग हाच प्रयोग जर शेतात केला तर? जाणून घ्या सविस्तर माहिती

March 6, 2022
ताज्या बातम्या

कांद्यामुळे आईच्या डोळ्यात पाणी! त्याने बनवला डोळ्यातलं पाणी बंद करणारा ‘स्मार्ट चाकू’

March 3, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories