कोरोनाचा भारतात ३० लाखांपेक्षा झालेले असताना अजुन सुद्धा कोरोनावर औषध उपलब्ध झालेले नाही. परंतु, कोरोनावर रोगप्रतिकार औषध म्हणून गुजरात सरकारने अर्ध्या राज्यात अर्सेनिकम अल्बम-30 हे होमिओपॅथी औषधाचे वाटप केलंय. ही माहीती राज्य सरकारच्या आरोग्य खात्याकडून सांगण्यात आली आहे.
कोरोनावरीलऔषध जरी विकसित झाले तर त्याची पूर्णपणे तपासणी केल्याशिवाय औषध बाजारात आणले जाणार नाही. आधुनिक वैद्यक शास्त्र व होमिओपॅथी औषध उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही अर्सेनिकम अल्बम-30 गोळ्या कोरोनावर परिणामकारक ठरत आहे असे अजुन तरी म्हणले नाही.
परंतु, आयुष खात्याच्या राज्याच्या संचालक भावना पटेल यांनी अर्सेनिकम अल्बम-30 या गोळ्यांच्या क्लिनिकल चाचण्यांमधून फारसे काही चांगले परिणाम दिसून न आल्याचे सांगितले आहे.
गुजरात सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात सुमारे ३ कोटी ४० लाख नागरिकांना उपचार म्हणून अर्सेनिकम अल्बम-30च्या गोळ्या दिल्याचे सांगितले आहे. इतकेच नव्हे तर, जागतिक आरोग्य संघटनेपुढे गुजरात सरकारने आयुष उपचार घेतल्यामुळे ३३,२६८ कोरोना रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढली असल्याचे सांगितले आहे.
या अगोदर ही, कोरोना रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम-३० या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला गेला होता. मात्र, त्याचे सेवन करण्यापूर्वी व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासणी आवश्यक असल्याने होमिओपॅथीक डॉक्टरचा सल्ल्यानेच सेवन करणे गरजेचे असल्याने तज्ज्ञांचे म्हणणे होते.