उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथील १७ वर्षाच्या दलित मुलीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे. पिडीत मुलगी आपल्या घरातुन स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला बाहेर पडलेली होती पण ती परत माघारी न आल्याने नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली.
पिडीत मुलगी सकाळी ८.३० वाजता आपल्या घरातुन बाहेर पडलेली होती. ती आपला स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी शेजारच्या गावात गेली होती.पण ती तिथून माघारी परतलीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीचा मृतदेह गावाजवळ २०० मीटर अंतरावर सापडला, तिची धारदार शस्त्राने गळा कापुन हत्या करण्यात आली असल्याचं पोलिसांंनी सांगितलंय.
दरम्यान उत्तर प्रदेशात लखीमपुर जिल्हातील गेल्या १० दिवसातील ही दुसरी घटना आहे, १५ ऑगस्टला देखील १३ वर्षाच्या मुलीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. यामुळे उत्तर प्रदेशातील न्यायव्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी कधी कमी होणार असा प्रश्न देशभरातुन विचारला जात आहे.