संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडमधील मोदी सरकार १५ टक्के हिस्सा विकणार असल्याचे इकॉनॉमिक टाइम्सने सांगितलं आहे. तर कंपनीच्या प्रति शेअरची किंमत १,००१ रु. इतकी निश्चित केली गेली आहे.
याचा फायदा केंद्र सरकारला ५,०२० कोटी रु. इतका होणार असून सरकार १६,७१९,३७५ इक्विटी शेअरही विकणार आहेत. सरकारचा १० टक्के हिस्सा असलेल्या ३,३४,३८,७५० इक्विटी शेअरची विक्री देखील करणार असल्याची माहिती इकॉनॉमिक टाइम्सने दिली आहे.
गेल्या बुधवारी एचएलएल कंपनीच्या शेअरचा भाव ११७७.७५ रुपये इतका झाला होता. या कंपनीत सरकारचा ८९.९७ टक्के हिस्सा असून कंपनीमध्ये २०२०-२१ साठी सरकारने २.१० लाख कोटी रु. निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले होते.२००७ मध्ये या कंपनीला नवरत्न असा देखील दर्जा देण्यात आला होता.