पृथ्वीच्या आजूबाजूने अनेक लघुग्रह येतात आणि जातात. त्यांच्यामुळे खरं तर पृथ्वीला कोणताही धोका नसतो. 1 सप्टेंबरला एक असाच लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. या लघुग्रहाचं विशेष म्हणजे पृथ्वी आणि लघुग्रहाचं अंतर चंद्राच्या अंतरापेक्षा कमी असेल. त्याचबरोबर अशी घटना घडण्यासाठी पुढची 12 वर्ष वाट बघावी लागेल.
पृथ्वी आणि चंद्रामधील सरासरी अंतर 3 लाख 84 हजार 400 किलोमीटर एवढं आहे. मात्र 11 ES4 असं नाव असलेल्या लघुग्रहाचं पृथ्वीपासूनच अंतर फक्त 1 लाख 21 हजार किलोमीटर एवढं असेल. थोडक्यात चंद्रापेक्षा तीन पटीने कमी अंतरावरून हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाईल.
शास्त्रज्ञांनुसार या लघुग्रहाचा पृथ्वीला कोणताही धोका नाही. 22 ते 49 मीटर व्यास असलेला लघुग्रह विमानाच्या आकाराचा आहे. जरी या लघुग्रहाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला तर घर्षणामुळे वातावरणातच तुकडे होऊन नष्ट होईल.
विशेष म्हणजे पृथ्वीच्या जवळून जाताना या लघुग्रहांचा 29 हजार 376 किलोमीटर प्रतितास एवढा असेल. या अगोदर 13 मार्च 2011 ला हा लघुग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ येऊन गेला होता. तेव्हा याच पृथ्वीपासूनचे अंतर 42 लाख 68 हजार 643 किलोमीटर एवढे होता. मात्र या वेळी हे अंतर फक्त 1 लाख 21 हजार किलोमीटर एवढं असेल.
नासाच्या जेट प्रोपोल्शन लॅबरोटरीच्या आकडेवारीनुसार हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून आठ वेळा गेला आहे. मात्र एक सप्टेंबरला हे अंतर आतापर्यंतचं सर्वात कमी अंतर असेल