‘बॅड बॉय बिलेनिअर्स’ या वेबसिरीजचा ट्रेलर नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्म वरून डिलीट करण्यात आला आहे. बॅड बॉय बिलेनिअर्स’ ही वेबसिरीज भारतातील कुप्रसिद्ध शक्तिशाली भांडवलदारांच्या भ्रष्टाचारांचा आढाव्याचे चित्रण करणारी आहे. येत्या 2 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर ती प्रदर्शित होणार होती.
परंतु, वेबसिरिज ज्या फसव्या उद्योजकांवर आधारित आहे त्यांनी यावर आक्षेप नोंदवला असून या प्रदर्शनाला विरोध दर्शवला केला आहे.
गेल्या आठवड्यात सहारा उद्योगाचे मुख्य सुब्रतो रॉय यांनी वेबसीरिजच्या स्थगितीसाठी बिहारमधील स्थानिक अरारिया कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने
वेबसीरिजच्या प्रदर्शनावर तात्पुरती स्थगिती दिली आहे.
बिहारच्या कोर्टाने आणलेल्या स्थिगितीविरोधात नेटफ्लिक्स पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे देखील म्हणले जात आहे.
तर सुब्रतो रॉय नंतर पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी यांनी देखील दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती परंतु ती दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली.
वेबसिरीजमध्ये पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी, सहारा ग्रुपचा सुब्रतो रॉय, एसबीआयला ९ हजार कोटीं बुडवून फरार झालेले किंगफिशर एअरलाइन्सचे चेअरमन विजय मल्ल्या आणि सत्यम घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी रामलिंगा राजू यांचे फोटो वेबसिरीजच्या पोस्टरमध्ये वापरण्यात आले आहेत.