भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २२ मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर केलं. यामुळे भारतातील जवळजवळ सगळेच उद्योग बंद करण्यात आले होते. गेली चार महीने सगळं बंद असल्यामुळे सर्वाधिक नुकसान हे मध्यम आणि सर्वसामान्य वर्गातील लोकांचं झालं आहे.
पण जसजसं लॉकडाऊन वाढत गेलं, यातुन हे लक्षात आलं की, लॉकडाऊन करुन देखील राज्य आणि केंद्र सरकारला विशेष काही करता आलं नाही. भारताने कोरोना रुग्णात ३० लाखांचा टप्पा पार केलाय. यामुळे लॉकडाऊन केल्याने काहीच निष्पण्ण झालेलं नसताना सरकार लॉकडाऊन कधी संपवणार, आणि सर्वसामान्यांचं आयुष्य पुर्वपदावर कधी येणार असा प्रश्न देशभरातुन विचारला जाऊ लागला आहे.
लॉकडाऊन काळात सर्वाधिक संघर्ष हा जत्रा आणि यात्रेमध्ये काम करणाऱ्या कलावंतांना सहन करावा लागलाय. कारण लॉकडाऊन काळात सगळं बंद असल्याने या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासोबत यावर अवलंबून असणाऱ्या छोटमोठ्या उद्योगांची देखील हीच दशा आहे. महाराष्ट्राची चारशे वर्षांची परंपरा असलेली पंढरपुरची आषाढी वारी देखील यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली. महाराष्ट्रात दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी देहू ते पंढरपुर वारीत सहभागी होतात.
पण याच्या दुसऱ्या बाजूला हजारोंच्या संख्येने लहान आणि छोठे उद्योग वारीसोबत पंढरपुरला जात असतात. पण यात सहभागी असणाऱ्या सर्वांची पुर्ण वर्षाची उपजिवीका ही या आषाढी वारीवर अवलंबून असते. पण वारी रद्द झाल्याने यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे.
या सोबत पंढरपुरात सुद्धा अनेक उदयोग आहेत जे पुर्णपणे मंदिरावर अवलंबून आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन विश्व वारकरी परिषदेने येत्या ३१ ऑगस्टला विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं, यानंतर वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनाला पाठींबा देणार असल्याचं सांगितलं. मात्र संपुर्ण महाराष्ट्रातून प्रकाश आंबेडकरांवर टिकेला सुरवात झाली. पण काही स्तरावर या भूमिकेचं कौतुक देखील करण्यात आलं आहे.
विठ्ठल हा महाराष्ट्रातील संपुर्ण बहूजन समाजाचे श्रद्धास्थान आहे. यासोबत वारकरी संप्रदायाने सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा निर्माण केली आहे. यामुळेच आषाढी वारीत देशभरातून सगळ्याच जाती आणि धर्मांची माणसं सामील होतात. यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि कामगार वर्ग सहभागी असतो. वारीत पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना देखील तितकच महत्वाचं स्थान आहे जे की आपल्याला हिंदू धर्मात क्वचितच पाहायला मिळते.
याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी येत्या ३१ ऑगस्टला पंढरपुर मंदीर उघडण्यासाठी आंदोलन करणार आहेत. यात वंचित कार्यकर्त्यांसोबत विश्व वारकरी परिषद देखील समाविष्ट असेल. यात १ लाख कार्यकर्त्यांना घेऊन प्रकाश आंबेडकर पंढरपुरला जाणार आहेत. पण हे आंदोलन विठ्ठल मंदीराच्या उघडण्यासोबतच मंदीरावर ज्यांची उपजिविका अवलंबून आहे अश्या सर्वांसाठी महत्वाचं ठरणार आहे. लॉकडाऊन काळात देखील वंचित बहूजन आघाडीने बस सेवा सुरु करण्यासाठी “डफली बजाओ” आंदोलन संपुर्ण महाराष्ट्रात केले होते.
यामुळे महाराष्ट्रात तात्काळ बससेवा सुरु करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राचं बहूजन समाजाचं श्रद्धास्थान असणारे विठ्ठल मंदीर देखील उघडले जावे. यासाठी ३१ ऑगस्टला आंदोलन होणार आहे.