काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अजय माकन यांची राजस्थान राज्य प्रभारी म्हणून नेमणूक झाली. ते रविवारी राजस्थानमधून बोलताना म्हणाले की, “भाजप हा पक्ष लोकशाहीला पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर संपवू पाहत आहे. पण त्यांची ही इच्छा राजस्थानमध्ये पूर्ण होऊ शकली नाही.”
याच पैशाचा आणि CBI, ED सारख्या सिक्युरिटी एजंसीचा वापर करून भाजपने मध्ये प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, गोवा या राज्यातील लोकशाही संपुष्टात आणली आहे, परंतु राजस्थानमधून त्यांना मोठी हार पत्करावी लागली.”, असं माकन रविवारी अलवार जिल्ह्यात बोलताना म्हणाले.
त्यानंतर माकन यांनी अशोक गेहलोत आणि पायलट या दोघांची त्यांच्या निवासस्थानी जयपुरला जाऊन भेट घेतली.