कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याला विरोध केला होता.याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने कोणत्याही परिस्थितीत जेईई आणि नीट परीक्षा घेण्याचं देखील सांगितलं होते.
मात्र आता महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थांना परीक्षा घरुनच देण्यासाठी मंजूरी दिली आहे. यामुळे विद्यार्थांना आपल्या घरी बसून अंतिम वर्षाची परीक्षा देता येईल. ही माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा होतील असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत निकाल लावला जाणार आहे.
राज्यपाल आणि कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी सांगितलं आहे.