कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि देशभरात लागू करण्यात आलेलं लॉकडाऊनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सगळ्यात मोठा परिणाम झाला आहे. सोमवारी केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने जीडीपीचे आकडे जाहीर केल्यानंतर देशभरात याबद्दल चर्चा होत आहे
परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्था खिळखिळी केली असल्याची टीका जपानमधल्या अर्थविषयक वृत्तपत्र निकेई एशियन, या रिव्ह्यूमध्ये भारतीय वित्त आयोगाचे माजी कार्यकारी संचालक रितेश कुमार सिंह यांनी केलीय
तर, जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा देखील समावेश होतो. म्हणून जीडीपीची नवी आकडेवारी आणि त्याचं विश्लेषण असं वृत्तांकन विदेशी प्रसारमाध्यमांनी केलं आहे. यात भारतीय “अर्थव्यवस्थेची विक्रमी घसरण” अशा शब्दात सीएनएन या अमेरिकेतील वाहिनीने म्हटलं आहे
नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्था सुधारण्याचं आश्वासन दिलं होत. परंतु सोमवारी केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने जीडीपीचे आकडे जाहीर केल्यानंतर अर्थव्यवस्था पूर्णतः डबघाईला आल्याचे दिसून येत आहे. २०२० मधील भारतीय अर्थव्यवस्थेची सगळ्यात मोठी घसरण म्हणून पाहिली जात आहे.
त्यामुळे आता भारतीय अर्थव्यवस्थेला 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचं मोदींचे स्वप्न आता फक्त स्वप्नच राहील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.