आज आहे ‘स्कायस्क्रॅपर डे’. या दिवसाला मराठीत विशेष असं काही नाव नाहीये, पण आपण अर्थ काढला तर तो साधारण ‘गगनचुंबी दिवस’ असा होतो. हे थोडं विचित्र वाटतंय पण हा दिवस जगातल्या मोठमोठ्या इमारती आहेत त्यासाठी साजरा केला जातो.
खरंतर हा असा दिवस कुठंही लिहून वगैरे किंवा कायदेशीर असा नाही परंतु स्कायस्क्रॅपरचे जनक ‘आर्किटेक्चर लुईस एच. सुलीवन’ यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. लुईस यांनी जगातील पहिली स्कायस्क्रॅपर १८८५ मध्ये शिकागो इथं बांधली होती. त्याची उंची १३८ फूट एवढी होती, म्हणजे आजच्या तुलनेत बरीच कमी.
जगातील सगळ्यात उंच स्कायस्क्रॅपर दुबईमधील बुर्ज खलिफा ही आहे. त्याची उंची २,७२२ फूट एवढी आहे म्हणजे ८२८ मीटर.
तुम्हाला माहीत आहे का?
हाँगकाँगच्या ज्या स्कायस्क्रॅपर आहेत त्यांना १३ वा मजलाच नाही आणि ज्या ज्या अंकांमध्ये ४ येतं तो कोणताच मजला नाही, कारण तिथं हे अंक दुर्दैवी मानले जातात.
मग यादिवशी विशेष असं काय करायचं किंवा कसा साजरा करायचा? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
१. तर यादिवशी तुम्ही जगातल्या विविध गगनचुंबी इमारतींविषयी जाणून घेऊ शकता. त्याचा इतिहास माहीत करून घेऊ शकता.
२. आपल्या भागात असणाऱ्या स्कायस्क्रॅपर्सना भेट देऊ शकता. भरपूर अशा इमारतींवरती रेस्टॉरंट किंवा कॅफे असतात मग तिथं यादिवशी जेवण करण्याची कल्पनापण भारी आहे.
३. या बिल्डिंग्सवरून आपल्या शहराचा दिसणारा सुरेख देखावाही आपण अनुभवू शकतो.
४. घरी आपण छोट्या छोट्या ब्लॉक्सचा वापर करून आपणही असे स्कायस्क्रॅपर बनवू शकतो.
५. आपण आपल्याही सभोवताली विशेष असणाऱ्या इमारतींची चर्चा करू शकतो. आपल्या कल्पना मांडू शकतो.
हा दिवस खरंतर आधुनिक जगाचं कौतुक करण्यासाठी, जाणून घेण्यासाठी असणारा अनौपचारिक दिवस आहे असं आपण म्हणू शकतो. बघा मग, जमलं तर तुम्हीपण नक्की हा दिवस साजरा करा