दोन बलात्काराच्या घटना ताज्या असताना पुन्हा एकदा उत्तर प्रदेश हादरला आहे. लखीमपुर जिल्हात ३ वर्षाच्या मुलीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे. २ तारखेला पिडीत मुलगी बेपत्ता होती. मात्र घरापासून काही अंतरावर मुलगी मृत अवस्थेत सापडली आहे.
यासंबंधी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये, मात्र गेल्या वीस दिवसातील उत्तर प्रदेशातील बलात्कार करुन हत्या करण्याची ही तिसरी घटना आहे.
मागच्या आठवड्यात याच जिल्हात एका १७ वर्षाच्या मुलीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती, यासोबत एका १३ वर्षाच्या मुलीची देखील अश्याच स्वरुपात बलात्कार करुन हत्या झाली होती.
दरम्यान, दिवसेंदिवस उत्तर प्रदेशात अश्या घटना वाढतच आहेत. यामुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील भयानक स्थिती समोर आली आहे. अश्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना उत्तर प्रदेश प्रशासन नेमकं काय काम करत आहे, असा प्रश्न संपुर्ण देशभरातुन विचारला जात आहे.