सध्या जगात सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त करण्यावर भर दिला जात आहे. भारताने देखील एक पाऊल पुढे टाकत जगातील सर्वात मोठा सोलार ट्री तयार केला आहे. हा सोलार ट्री दरवर्षी 12 ते 14 हजार युनिट स्वच्छ आणि हरित ऊर्जा तयार करून शकतो.
पश्चिम बंगाल येथील दुर्गापुर शहरात सीएसआयआर- सेंट्रल मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने जगातील सर्वात मोठ्या सोलार ट्रीची निर्मिती केली आहे. या सोलार ट्री मध्ये 35 सौर फोटोवोल्टिक पॅनल बसवण्यात आले आहेत.
CSIR-CMERI develops World’s Largest Solar Tree
The installed capacity of the Solar Tree is above 11.5 kWp and has an annual capacity to generate 12,000-14,000 units of Clean and Green Power.
Read more: https://t.co/jwCXGafbnP pic.twitter.com/u6ov5eackd
— PIB India (@PIB_India) August 31, 2020
या संस्थेत काम करणारे प्राध्यापक हरीश हिराणी म्हणाले, ‘आम्ही जगातील सर्वात मोठ्या सोलर ट्रीची निर्मिती केली आहे. या सोलार ट्रीचे सोलार पॅनल आपण हव्या त्या दिशेला वळवू शकतो.’
तसेच सोलर पॅनल्सवर कमीत कमी सावली पडेल याची देखील काळजी घेतली गेली आहे. सोलार ट्रीच्या मदतीने जास्त क्षमता असणारे शेतीचे पंप, ई-ट्रॅक्टर्स यासारख्या साधनांमध्ये याचा उपयोग होऊ शकतो.
सूर्यापासून ऊर्जा मिळवत असताना सौर पॅनलवर सावली पडणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. या सोलार ट्री मध्ये बसवण्यात आलेले 35 सोलर पॅनल अशाप्रकारे बसवले आहेत की त्यावर कशाचीही सावली पडणार नाही. त्यामुळे सूर्यापासून जास्तीत जास्त ऊर्जा मिळवली जाते.
कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी फायदेशीर
शेतीची कामं करत असताना वेगवेगळ्या साधनांसाठी पेट्रोल, डिझेलसारख्या जीवाश्म इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन केलं जातं. पण जर या सोलार ट्रीच्या मदतीने उर्जा निर्माण केली, तर पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत 10 ते 12 टन कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन कमी केलं जाऊ शकतं. त्यामुळे याचा पर्यावरणाला देखील फायदा होईल.
त्यामुळे भारतात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अशा उपकरणांचा नक्कीच फायदा होईल.