अभिनेत्री कंगना राणावत हीने “मुंबई ही मला पाकव्याप्त काश्मीर वाटत आहे” असं ट्विट केलं होत. तिने शिवसेना खासदार संजय राऊत यांना उत्तर देताना हे ट्विट केलं होतं. यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आहे. कंगनाच्या नावे अनेक ट्रेंड ट्विटरवर चालवले जात आहेत.
https://twitter.com/KanganaTeam/status/1301413968729210880
मात्र यानंतर चित्रपट क्षेत्रातील लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. याला देखील कंगनाने प्रत्यूतर दिले. मात्र ट्विटरवर कंगनाला अनेकांनी मुंबईला माघारी न येण्याचा सल्ला दिला, यावर चिडून कंगनाने “मी मुंबईला येत आहे, मी माझं एअरपोर्टला येण्याची वेळ पण सर्वांना सांगते, कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा”
https://twitter.com/KanganaTeam/status/1301782810261299200
दरम्यान, सुशांत सिंग रजपूतच्या केसमध्ये कंगनाने बेधडकपणे भूमिका मांडल्यावर संपुर्ण देशातुन तिचं कौतूक झाले होते. मात्र मुंबई पोलिसांवरील विधानानंतर अनेकांनी कंगनाविरोधात आवाज उठवला आहे.