गुरुवारी टाइम्सने ‘हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१’ जाहीर केली. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) आपलं स्थान कायम ठेवलं आहे. पुणे विद्यापीठ या यादीमध्ये ६५१ ते ७०० स्थानावर आहे. मागच्या वर्षी विद्यापीठ ६०१ ते ८०० च्या दरम्यान होतं.
या यादीत पहिल्या १००० विद्यापीठांची नावे आहेत. यात प्रामुख्याने शिक्षण, संशोधन, ज्ञानाचा प्रसार, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी अशा निकषांचा समावेश आहे.
तर विद्यापीठाने टॉप विद्यापीठांच्या यादीत देशात देखील नववं स्थान मिळवल्याचं ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’च्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
“विद्यापीठाने मागच्या वर्षीपासून आपलं स्थान कायम ठेवलं आहे. याचं श्रेय विद्यापीठात मोठ्या प्रमाणात असणारे संशोधक, प्राध्यापक आणि सहकारी यांना जातं. यावर्षी विद्यापीठाचं स्थान हे ६०० ते ८०० च्या दरम्यान आहे. येणाऱ्या वर्षी प्रगती करून हे स्थान ६०० च्या दरम्यान आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत” असं पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले.
पुणे विद्यापीठ हे १९४९ साली स्थापन झाले होते. पुणे विद्यापीठ जवळजवळ ४११ एकरांमध्ये आहे.