मुंबईसह राज्यातील 50 % सॅनिटायझर निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती सीजीएसआयने (कन्झ्युमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया) बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात सांगितली आहे.
यात मुंबई, नवी मुंबई आणि इतर राज्यात विक्रीस असलेल्या सॅनिटायझरपैकी 50 टक्के सॅनिटायझर निकृष्ट असून ते वापरण्यासाठी अयोग्य असल्याचे या अहवालात म्हणले आहे.
विविध कंपन्यांनी सॅनिटायझर कोरोना संसर्ग टाळण्याचा उपाय असल्याचे म्हणत सॅनिटायझरची बाजारात विक्री वाढवली होती. परंतु सॅनिटायझर खरंच कोरोना संसर्ग टाळण्याचा उपाय आहे का याची शहानिशा करण्यासाठी सीजीएसआय’ने ऑगस्टमध्ये यावर सर्वेक्षण केले होते.
यात त्यांनी बाजारात विक्रीस असलेल्या 122 सॅनिटायझरच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत चाचणी केली होती. परंतु यात, 122 पैकी 50 टक्के सॅनिटायझर निकृष्ट दर्जाचे असून 5 सॅनिटायझरमध्ये विषारी मिथेनॉलचा वापर केल्याचे आढळून आले. मिथेनॉलचा शरीरावर गंभीर परिणाम होऊन होत असतो. तर यामुळे अंधत्वही येण्याचा देखील धोका असतो