इतिहासात अफूसाठी झालं होतं युद्ध..! वाचून जरा विचित्र वाटतंय ना? पण हे खरंय. इतिहासात एकोणिसाव्या शतकातच्या मध्यात पाश्चात्त्य देश आणि चीनच्या ‘क्विंग डेन्स्टि’ राज्यात या दोन सशस्त्र सेनेत एकदा नाही तर दोनवेळा हे युद्ध झाले होते.
यातील पहिलं युद्ध हे १८व्या शतकात ४०च्या दशकात तर दुसरं युद्ध हे ५० च्या दशकात झालं होतं. पहिलं युद्ध हे फक्त ब्रिटीश विरुद्ध चीन असं होतं मात्र दुसऱ्या युद्धात चीनविरुद्ध ब्रिटीश आणि फ्रेंच असे दोन देश होते. याला अॅरो युद्ध किंवा अँग्लो-फ्रेंच चीन युद्ध असंही म्हटलं जातं. या दोन्हीही युद्धांमध्ये चीनला पराभव पत्करावा लागला होता आणि विजेत्यांना विविध व्यावसायिक सुविधा, कायदेशीर आणि प्रादेशिक सवलती देण्याचं ठरलं होतं. तर आपण पहिल्या युद्धाविषयी जाणून घेणार आहोत, हे युद्ध ४ सप्टेंबर १९३९ या दिवशी चालू झालं होतं.
अफूच्या युद्धापूर्वी पूर्वेकडे असणाऱ्या देशात चीन हा प्रमुख सत्ता असणाराच नाही तर चैनीच्या वस्तू आणि इतर वस्तू मोठ्या प्रमाणात निर्यात करणाराही देश होता. या युद्धाची ठिणगी चीनकडून अफूव्यवसाय दाबण्याच्या प्रयत्नांमुळं पडली होती. १८व्या शतकाच्या सुरुवातीला परदेशी व्यापाऱ्यांनी प्रामुख्याने ब्रिटीश व्यापाऱ्यांनी बेकायदेशीररित्या अफूची निर्यात चीनमधून चालू केली होती आणि १८२० नंतर यात खूपच वाढ झाली होती. या सर्व गोष्टींने चीनवर व्यसनांचा वाईट परिणाम होऊ पाहत होता. त्यामुळं चीनला हे पाऊल ऊचलावं लागलं होतं.
मग १८३९ च्या वसंत ॠतुमध्ये ब्रिटीश व्यापाऱ्यांनी कँटन गोदामात साठवलेलं अफू चीनी सरकारने जप्त करुन नष्ट केलं. यातूनच या युद्धाची ठिणगी पडली. मग हे शत्रुत्व टोकाला गेलं.
नंतर युद्धात ब्रिटीशांनी चीनचं नानजिंग हे शहर ताब्यात घेतलं. त्यानंतर २९ ऑगस्ट १८४२ रोजी शांतता प्रस्थापित करण्यात आली, त्यामध्ये असं ठरलं की चीननं ब्रिटीशांना मोठी नुकसान भरपाई द्यावी. आणि चीनमधील बंदरांची संख्या वाढवावी, जिथं ब्रिटीश व्यापाऱ्यांना व्यवसायाची संधी मिळावी तसेच अनेक व्यावसायिक आणि प्रादेशिक सवलती मिळाव्या. तसं पाहायला गेलं तर हे युद्ध जास्त मोठं नव्हतं. यामध्ये फक्त १२ नौदल जहाजांचा आणि ५,००० सैनिकांचा समावेश होता.