जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना कोरोनाची लस येण्यासाठी २०२१ पर्यंत वाट बघावी लागेल अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे.
कोरोनाचा फटका २०० पेक्षा अधिक देशांना बसला असून सर्वंच सगळेच कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीची वाट पाहत आहेत. परंतु लसीचं उत्पादन आणि वितरण हे एक मोठं आव्हान सर्वांपुढे उभे आहे.
जिनाव्हामध्ये एका ब्रिफिंगदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गरेट हॅरिस यांनी “पुढील वर्षाच्या मध्यापूर्वी जगभरात व्यापक स्वरूपात कोरोना लसीच्या उपलब्धतेची आपण अपेक्षा करू शकत नाही. कोरोना लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा हा मोठा असेल. ही लस किती सुरक्षित ठेवते आणि लस किती सुरक्षित आहे हे पाहण्याची अधिक गरज असल्याचे म्हणले आहेत.