शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संभ्रम अखेर सुटला आहे. कुलगुरू समिती आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या चर्चेनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून विद्यापीठाच्या कुलगुरूंना शासन परिपत्रक पाठविण्यात आले आहेत. याबाबत महाराष्ट्र माहिती शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
अंतिम वर्षाची होणार असल्याचं आता निश्चित झालं असून ही परीक्षा ५० गुणांची असेल. यासाठी ओपन बुक, एमसीक्यू, असाईनमेन्ट बेस अशा तीन पर्यायांचा विचार केला जाणार आहे. प्रात्यक्षिक नसून तोंडी परीक्षा होणार आहे. ३१ ऑक्टोबर पर्यंत सर्व विद्यापीठांना परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावा लागणार असल्याचंही शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परिषदेत सांगितलं.
कशी होणार परीक्षा?
१. परीक्षेत १ गुणांचे ६० प्रश्न असतील. त्यातील ५० प्रश्न सोडवणे आवश्यक असेल.
२. परीक्षेसाठी १ तासाचा वेळ असेल.
३. इंटर्नल आणि एक्सटर्नला प्रत्येकी ५० मार्क्स असणार आहेत.
४. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल किंवा लॅपटॉप नाहीत. त्यांची परीक्षा MKCL मार्फत घेण्यात येईल.