कोरोना रुग्णांच्या यादीत भारत ब्राझीलला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतात आता ४१ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या झालेली आहे.
ADVERTISEMENT
भारतात ४१,१३,८१२ एवढे कोरोना रुग्ण झाले आहेत. यात मागील २४ तासात ९०,६३३ एवढे रुग्ण सापडले आहेत, तर १०५६ रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे.
भारतात आतापर्यंत ३१,८०,८६६ एवढे रुग्ण कोरोनातुन बरे झालेले आहेत, तर यातुन ७०,६२६ एवढ्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, मार्च महीन्यापासुन भारतात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र तरी देखील प्रशासनाला कोरोनावर आळा घालण्याला अपयश आलेले आहे. यापुढे प्रशासन कोरोना थांबवण्यासाठी नेमके काय प्रयत्न करणार असा प्रश्न देशभरातून विचारला जाऊ लागला आहे.