मागच्या महिन्यात राजस्थानमधील बगडी या गावात मुकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी रविवारी मायावती यांनी ट्विट करून राजस्थान सरकारवर निशाणा साधला आहे. “सरकारने दलितविरोधी मानसिकता सोडून द्यावी आणि आरोपीवर कडक कारवाई करावी” अशी मागणी त्यांनी केली आहे.
1. राजस्थान में जिला दौसा के ग्राम बगड़ी की मूक बाधिर दलित बालिका के साथ पिछले 4 अगस्त को किए गए गैंगरेप के सभी आरोपी अभी तक भी नहीं पकड़े गए हैं। पीड़ित परिवार की शिकायत है कि वहाँ की कांग्रेसी सरकार उन्हें संरक्षण दे रही है, जो अति-दुःखद व अति-निन्दनीय। 1/2
— Mayawati (@Mayawati) September 6, 2020
“या घटनेतील आरोपी अजुन पकडले गेले नाहीत. मुलीच्या घरच्यांचा आरोप आहे की काँग्रेस सरकार आरोपींना संरक्षण देत आहे, जे अतिशय दुःखद आणि निंदनीय आहे.” असंही त्या ट्विटमध्ये म्हणाल्या.
काय होती घटना?
दौसा जिल्यातील बगडी या गावी ४ ऑगस्ट रोजी ६ युवकांनी एका दलित कुटूंबातील मुकबधीर मुलीवर बलात्कार केला होता.
याबाबत मुलीच्या आईने सांगितलं की, तिचे पती कामासाठी विदेशात गेलेले होते आणि ३ ऑगस्ट रोजी तीसुध्दा बाहेर गेली होती. त्यानंतर माघारी आल्यावर तिला ही घटना समजली.
त्यानंतर मुलीला भेटण्यासाठी बाल संरक्षण समितीची टीम तिथं पोहचली. मुलीनेही हातवारे करून “६ युवकांनी तिच्यावर जबरदस्ती केली आणि मारहाण केली.” असं सांगितलं होतं.
या घटनेला एक महिना उलटून गेला आहे. मात्र अजूनही कोणती कारवाई करण्यात आली नाही. याबाबत सरकारने आपली मानसिकता बदलून लवकरात लवकर मुलीच्या घरच्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.