जर्मनीत ओअर-एर्केन्सविक शहरातील नॉर्थ राईन-वेस्टफालियामध्ये या दोन टीम पूर्णपणे नग्न अवस्थेत फुटबॉलची मॅच खेळल्या आहेत. खेळातील वाढत्या व्यावसायिकरणाच्या विरोधात निषेध म्हणून हा सामना खेळाडूंनी नग्णपणे खेळला आहे.
हा सामना जर्मनीतील रूहर येथे उत्तरेकडे स्टीम्बरबर्ग स्टेडियमवर गेरिट स्टारक्झेव्हस्की या कलाकाराने आयोजित केला होता. “फुटबॉलची व्यवस्था ही बिघडली आहे, म्हणूनच आम्ही असे नग्न झालो आहे” असं गेरिट म्हणाला.
यासोबत “प्रत्येकाला वेगळेपण किंवा सत्यता हवी असते, परंतु मला असं वाटतं की आपण जाहिरात, प्रसिद्धी, कपडे हे सर्व काही न करता, त्यापलीकडे खरोखर आपण स्वतः म्हणून प्रामाणिक आणि वेगळे आहोत.” असं देखील सामन्यापूर्वी स्पोर्ट्स मॅगझिन ११ शी बोलताना गेरिट म्हणाला.
स्टारक्झेव्हस्कीची ही फुटबॉलच्या वाढत्या व्यावसायिकरणावरची टीका अनेकजणांच्या काळजाला भिडली. फुटबॉल नियामक मंडळाच्या (फिफा) प्रमुखांविरुद्ध भ्रष्टाचाराबद्दल स्विस लोकांनी फिर्याद दाखल केली होती. मात्र या तक्रारीनंतर काही आठवड्यानंतर ही घटना घडली आहे.
व्यावसायिकरणाला विरोध म्हणून सामन्याच्या वेळी खेळाडूंनी फक्त फुटबॉल शूज घातले होते आणि टीम ओळखण्यासाठी एकाच रंगाचे सॉक्स घातले होते. यासोबत खेळाडूंच्या पाठीवरचा नंबर हाताने रंगवलेला होता.
“शारीरिक वेगळेपण ही अशी एक गोष्ट आहे जी सध्याच्या फुटबॉलमध्ये नाही आणि सध्याची विशिष्ट प्रकारची शरीराची प्रतिमा ही फक्त विकली जाते. तीही प्रतिमा अगदी परिपूर्ण असली पाहिजे, आणि शेवटी हे सर्व पैशासाठी किंवा व्यवसायासाठीची गोष्ट आहे,” असंही स्टारक्झेव्हस्की म्हणाला.
“आमच्या नग्न कृत्यांसह, आम्ही विविधता आणि नैसर्गिकतेचे आणि सोशल मीडियावर विसंबून असलेले आणि सौंदर्याच्या खोट्या आदर्शांच्या विरोधात एक उदाहरण उभे करू इच्छित आहे,” असं स्टारक्झेव्हस्की म्हणा.
दरम्यान, या आंदोलनाचे संपुर्ण जगभरातल्या फुटबॉल प्रेमींनी कौतुक केले आहे.