केरळमधील पठाणमथिट्टा जिल्ह्यात एका रुग्णवाहिका चालकाने कोविड-१९ रूग्णावर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच केरळमध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे.
केरळमधील तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील कनिष्ठ आरोग्य निरीक्षकाला कोविड-१९ चा निगेटिव्ह रिपोर्ट आणण्यासाठी त्याच्या निवासस्थानी गेलेल्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
ही घटना उघडकीस आल्यावर आरोग्य विभागाने कनिष्ठ आरोग्य निरीक्षक प्रदीप कुमार (वय 44) यांना निलंबित केले आहे.
दुसर्या जिल्ह्यात घरकामासाठी जाणार्या या महिलेवर कुमार यांनी आपल्या अपार्टमेंटमध्ये एक दिवस बांधून निर्घृणपणे जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तिने सांगितले की ती 3 सप्टेंबर रोजी दुपारी अपार्टमेंटमध्ये गेली होती आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत कुमारने तिला तिथेच बांधून ठेवले आणि पोलिसांना तिने क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केल्याचे पोलिसांना सांगण्याची धमकी दिली.
कामावर गेल्यावर तिच्या मालकाने कोविड-१९ निगेटिव्ह रिपोर्टचा आग्रह धरल्यामुळे तिला प्रमाणपत्राची गरज होती. कोरोना महामारीतील परिस्थितीत अशा घडणाऱ्या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीची आणि संतापाची लाट तयार झाली आहे.