NIA ने एल्गार परिषदेच्या झालेल्या कार्यक्रमाबाबतीत कबीर कलामंचाचे कार्यकर्ते सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे.
याआधी यासंबंधी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. सागर आणि रमेश हे दोघेही ‘गाण्यांच्या माध्यमातून प्रबोधन करणारे’ कार्यकर्ते आहेत. १ जानेवारी २०१८ साली भीमा-कोरेगांव शौर्य दिनाच्या कार्यक्रमात देखील ते सहभागी होते.
३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात कबीर कलामंच देखील सहभागी होता. यामुळे दलित आणि मराठा लोकांमध्ये हिंसा निर्माण करण्याचं काम केलं असल्याचं सांगून उजव्या विचारसरणीच्या तुषार दामगुदे यांनी एफआईआर दाखल केली होती.
सागर आणि रमेश यांचं असं म्हणणं आहे की एनआईए त्यांना आधीच अटक झालेल्या लोकांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी दबाव टाकत आहे. अटकेपूर्वी काही वेळ आधी दोघांनी बनवलेल्या व्हिडिओत असं सांगितलं आहे की, “आधी आम्हाला चौकशीसाठी बोलवलं होतं आणि नंतर सोडून दिलं, परंतु ४ सप्टेंबरला पुन्हा एकदा बोलवलं गेलं.” त्यावेळी एनआईएचे अधिकारी म्हणाले की, ” नक्षलवाद्यांशी तुमचे संबंध आहेत हे तुम्ही कबूल करा, तुम्ही कबूल केलं तर आम्ही तुम्हाला सोडून देऊ”
व्हिडिओत पुढे दोघे म्हणाले की, “आम्ही माफी मागणार नाही, आम्ही सावरकरांची औलाद नाही, आम्ही बाबासाहेबांची औलाद आहे. आम्ही काहीच चुकीचं केलं नाही. आम्ही संविधानाच्या मार्गाने जात आहोत, पण आज आम्हाला अटक होण्याची शक्यता आहे.” असंही ते व्हिडिओत म्हणले होते.
यासोबत कबीर कलामंचच्या महिला कार्यकर्त्या आणि कलाकार ज्योती जगताप यांनादेखील भीमा कोरेगांवप्रकरणी पुणे ATS कडून अटक करण्यात आली आहे. कबीर कला मंचाच्या अधिकृत फेसबूक पेजवरून ही माहीती कळवण्यात आली.
https://www.facebook.com/589848294544409/posts/1447292358799994/
कबीर कलामंचाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही २०१३ मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. एनआईएने यापूर्वीही १४ एप्रिल २०२० रोजी आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा अश्या अनेकजणांना अटक केली होती.
दरम्यान, भिमा कोरेगाव दंगलीसंबंधी महाराष्ट्रात मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर देखील ठिकठिकाणी गुन्हे नोंद करण्यात आले होते. मात्र यातल्या कोणावरच पोलिसांनी अद्याप कसलीच कारवाई केलेली नाही.