सध्या जगात नेटफ्लिक्स पाहणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खिळवून ठेवणार्या वेबसिरीज, चित्रपटांमुळे मोठ्यांसोबत लहान मुलांना देखील याची भुरळ पडली आहे. पण नेटफ्लिक्सवर लहान मुलांनी काय बघावं यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेटफ्लिक्सने पालकांना पॅरेंट पिन नावाचा पर्याय दिला आहे. मात्र जर मुलाने पॅरेंट पिनच हॅक केला तर?
जगप्रसिद्ध आयरीश आणि कॅनडियन लेखक एड ओ’लाफलीन यांच्या मुलीने कल्पकतेचा वापर करत पेरेंट पिन हॅक केला आहे. लेखक लाफलीन यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली.
My youngest hacked our Netflix parental code. She put light grease on the remote and got me to input the code when she wasn’t looking. Then she noted the numbers I’d pressed and went through the combinations later. I’m both frightened and impressed.
— Ed O'Loughlin (@edoloughlin) September 6, 2020
असा हॅक केला नेटफ्लिक्स कोड
त्यांच्या बारा वर्षाच्या मुलीला नेटफ्लिक्सवर ‘द अम्ब्रेला अकॅडमी’ नावाची वेब सिरीज पाहायची होती. मात्र तिने वडिलांची परवानगी घेण्याऐवजी स्वतःच पॅरेंट पिन हॅक केला. लेखक लाफलीन यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या मुलींनं कशाप्रकारे पेरेंट पिन काढून घेतला हे सांगितलं आहे. त्यांच्या मुलींनं रिमोटवर थोडसं ग्रीस लावलं आणि वडिलांना पॅरेंट पिन काढण्यासाठी दिला. त्यानंतर तिने वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरून खरा पॅरेंट पिन शोधला.
चार अंकी पिन नेमका कसा निवडावा?
या घटनेनंतर अनेक पालकांना धास्ती भरली असून अवघड पिन कसा निवडावा असा प्रश्न ते विचारत आहे.
ट्विटरवर एका व्यक्तीने चार अंकी पिन कसा ठेवावा हे सांगितलं आहे. जर तुम्ही सारख्याच अंकाचा चार अंकी पिन ठेवला, तर त्याचे कॉम्बिनेशन फक्त पंधरा असतात. मात्र वेगवेगळ्या अंकांचा वापर करून जर चार अंकी पिन तयार केला तर त्याचे कॉम्बिनेशन दहा हजार असतात.
लेखक लाफलीन यांच्या ट्विटला 3 लाख 60 हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं असून 34 हजारांपेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केलं आहे.