वेगवेगळ्या देशातील ३०,००० लोकांवर कोरोना महामारीचा काय परिणाम झाला? याचा अहवाल बीबीसीने जाहीर केला.
या संशोधनातून असं समोर आलं आहे की, या महामारीचा सर्वात जास्त त्रास गरीब देश आणि तरुण लोकांना झाला आहे. गरीब देशांतील लोकांच्या उत्पन्नात ६९% एवढी घट तर त्या तुलनेत श्रीमंत देशातील लोकांच्या उत्पन्नात 45% एवढी घट झाली आहे.
यातील परिणामात वंश आणि लिंगानुसारदेखील भिन्नता दिसून आली आहे. यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांना, तर पांढऱ्या लोकांपेक्षा कृष्णवर्णीय लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग दिसून आला आहे.
हे संशोधन २७ देशांमध्ये बीबीसी वर्ल्ड सर्व्हिससाठी ग्लोबस्कॅनद्वारे करण्यात आलं होतं.
आमच्या सर्वेक्षणातून असं दिसून आलं आहे की, ज्या देशाची प्रशासकीय व्यवस्था चांगली नव्हती त्या देशांना कारोनाचा जास्त धोका दिसून आला आहे” असं ग्लोबस्कॅनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस काउल्टर यांनी सांगितलं.
गरीब आणि श्रीमंत दरी
या महामारीमुळे गरीब देशातील लोकांवर जास्त वाईट परिणाम झाला आहे आणि त्यामुळे जगात आणि देशात तीव्र असमानता निर्माण झाल्याचं यातून दिसून आलं आहे.
ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) आणि याचे सदस्य नसलेल्या देशांमध्ये खूपच फरक दिसून आला आहे. ओईसीडी हा जगातील सर्वात समृद्ध अर्थव्यवस्थांमध्ये समावेश असलेल्या देशांचा आंतरराष्ट्रीय गट आहे.
‘ओईसीडी’चे सदस्य नसलेल्या देशांमधील उत्पन्नामध्ये ४५% एवढा फरक ओईसीडी च्या तुलनेत दिसून आला आहे.
पिढीमध्ये दरी
यामधून असंही दिसून आलं आहे की, तरुण आणि वृद्ध यात तरुण पिढीला यामुळे तुलनेने जास्त त्रास झाला आहे, कारण त्यांच्या नोकरीच्या संधी, परीक्षा आणि शिक्षण यावर मोठा फरक पडला आहे.
जवळपास १० मधील ६ लोकांच्या उत्पन्नावर महामारीमुळे परिणाम झाला आहे.
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना याचा जास्त त्रास झाला असल्याचं इटली, जर्मनी, युके या देशांमधून समजलं आहे.
युएस मधील, अमेरिकेत १४% एवढा कृष्णवर्णीय लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार, तर ७% गौरवर्णीय लोकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याचं समजलं आहे.