भारताच्या २०२०च्या ग्लोबल इकॉनॉमी फ्रीडम इंडेक्समध्ये मोठी घसरण होऊन भारत हा ७९ व्या स्थानावरुन घसरून यावर्षी तो १०५ व्या क्रमांकावर पोहोचला असल्याची माहिती पीटीआयने वृत्ताने दिली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारताची आर्थिक स्थिती पूर्णतः ढासळली आहे. यामुळे याचा परिणाम नुकत्याच सादर झालेल्या क्रमवारीवर ही दिसून आला आहे.
हा इंडेक्स कॅनडातील फ्रेजर इस्टीट्यूटने भारतातील थिंकटॅक सेंटर फॉर सिव्हिल सोसायटीने मिळून प्रसिद्ध केला आहे. यात भारत २६ स्थानांनी घसरून १०५ स्थानावर पोहोचला असल्याचे सांगितले आहे.
गेल्या वर्षी २०१९च्या ग्लोबल इकॉनॉमी फ्रीडम इंडेक्समध्ये भारत हा ७९ व्या स्थानावर होता. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार हाँगकाँग आणि सिंगापूर या इंडेक्समध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. तर चीन भारतापेक्षा मागे म्हणजे १२४व्या क्रमांकावर आहे.
या रिपोर्टनुसार गेल्या एक वर्षात भारत सरकारची आर्थिक स्थिती, संपत्तीचे अधिकार, जागतिक पातळीवरील व्यापाराचे स्वातंत्र्य, श्रम आणि अन्य कायदा या बाबत परिस्थिती खराब असल्यामुळे घसरण झाल्याचे म्हणले आहे.