दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड महिन्याभरासाठी बरखास्त करण्यात आले आहे. संघामधील वर्णद्वेष व भ्रष्टाचाराच्या कारणाने दक्षिण आफ्रिका संघाला दक्षिण आफ्रिका क्रीडा संघ आणि ऑलिम्पिक समितीने क्रिकेट बोर्डाला एक महीन्यासाठी निलंबित केले आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे चीफ एक्झिक्युटिव्ह थबांग मुन्रो यांच्या वागणूक आणि भ्रष्टाचाराच्या कारभारामुळे संघावर हा प्रसंग ओढावल्याचं सांगितले जातंय.
दक्षिण आफ्रिका संघावर बंदी यायची ही पहीली वेळ नाही.याआधीही दक्षिण आफ्रिका संघावर २१ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर बसण्याची वेळ आली होती. यावेळी देखील संघावर वर्णद्वेष करत असल्याच्या आरोपावरुन कारवाई करण्यात आली होती.
आता पुन्हा एकदा आफ्रिका संघाने आयसीसीचा नियम मोडला आहे. त्यामुळे ही कारवाई होणार असून त्याची लवकरच चौकशी सुरू केली जाणार आहे.