सध्याच्या काळात सायबर क्राईमचं प्रमाण वाढत आहे. मेसेजेस, व्हॉटसअप, फोनपे आणि विविध माध्यमातून खोटी माहिती पसरवून लोकांना फसवून पैसे उकळण्याच्या घटना समोर येताना दिसत आहे. अशातच बारामती शहरात अशीच एक घटना घडल्यामुळे लोकांमध्ये चिंतेचा वातावरण तयार झालं आहे.
१२ सप्टेंबर रोजी बारामतीतील एका युवकाला ‘तुमचा नंबर २४ तासात बंद होईल,यासाठी आधार कार्ड जमा करा. अधिक माहितीसाठी कस्टमर केअरशी ७४५०९२६४१४ या नंबरवर संपर्क करा.’ असा मेसेज आला होता, मात्र त्याने प्रसंगावधान दाखवल्यामुळे हे संकट टळलं. तुम्हालाही या नंबरवरून कॉल, मेसेज आला तर कोणतीही माहिती शेअर करू नका.
या नंबरवरती कॉल केल्यानंतर त्यांनी KYC व्हेरिफिकेशनसाठी एक ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी सांगितलं. मात्र याविषयी सर्च केल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीवरून असं लक्षात आलं की, हे फेक कॉल्स आणि मेसेज आहेत. त्यामुळे त्यांनी व्हेरिफिकेशनसाठी मागितलेला कोड या युवकाने दिला नाही. आणि या बातमीबाबत त्यांना विचारल्यानंतर मात्र त्यांनी लगेच कॉल कट केला.
कशी होते फसवणूक? हा व्हिडीओ पहा
१. तुमचं सिमकार्ज बंद होणार आहे किंवा तुम्हाल लॉटरी लागली असल्याचा एक फेक मेसेज येतो. मग तुम्ही लगेच त्या नंबरवरती कॉल करता.
२. त्यानंतर ते काहीतरी कारण सांगून प्लेस्टोर वरून “quik support” नावाचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगतात.
३. त्यानंतर व्हेरीफाय करून आलेला कोड ते विचारतात, पण सावधान..! हा कोड तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सांगायचा नाही, तो जर तुम्ही सांगितला तर तुमच्या मोबाईलचा पूर्ण अक्सेस त्यांना भेटतो आणि तुमच्या अकाऊंटमधील सगळे पैसे ते ट्रान्स्फर करून घेऊ शकतात. त्यामुळे अशा मेसेजेस आणि कॉल पासून तुम्ही सावधान राहिलं पाहिजे.
खरंतर, anydesk किंवा quik support नावाचे ऍप्लिकेशन आपल्यासाठी उपयोगी असतात. लांबून ऑपरेट करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो, मात्र असे लोक याचा गैरवापर करताना दिसत आहेत.
यावरती जागरूकता होणं गरजेचं आहे आणि यावरती गंभीर कारवाई करण्याची देखील गरज असल्याचं दिसून येतं आहे.