दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे. UAPA (Unlawful Activities Prevention Act) अंतर्गत ही अटक करण्यात आली आहे.
एफआयआर मध्ये असं सांगण्यात आलंय की, उमर खालिद याने दोन ठिकाणी प्रक्षोभक भाषण दिली आहेत. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भारत भेटीदरम्यान लोकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यासाठी आवाहन केले गेले. यामुळे लोक रस्त्यावर उतरले असं नमुद करण्यात आलं आहे. त्याला सोमवारी दिल्लीच्या कोर्टात हजर केले जाईल.
यावर बोलताना उमर खालीदचे वकील त्रिदीप पैस हे शनिवारी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले होते की, खालिद यांच्यावरील आरोप “पूर्णपणे खोटे, बनावट आणि कठोरपणे बेकायदेशीरपणे खरेदी केले गेले” आहेत.
सप्टेंबर मध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत उमर खालिद म्हणाला होता की, दोन प्रकारचे कायदे पाळले जात आहेत – एक म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांसाठी आणि दुसरा सामान्य लोक, ज्यांच्याविरूद्ध “पुरावे तयार केले जात”
दरम्यान JNU विद्यापीठापासुनच उमर खालिद संपुर्ण देशात चर्चेत राहीला आहे. सरकारला नेहमीच धारेवर धरणारा विद्यार्थी चळवळीतला एक उगवता नेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. CAA-NRC आंदोलनात देखील त्याने सरकारला अनेक प्रश्न विचारले होते.