सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यावर अजून कोणतीही लस निघालेली नाही. त्यामुळे कोरोनापासून रक्षण करायचं असेल तर सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं यासारख्या गोष्टीच आपल्या हातात आहेत. मात्र अनेक जणांना मास्क कसं वापरावं याविषयी माहिती नसते. या लेखातून मास्क कसं वापरावं हे आपण जाणून घेणार आहे. त्याचबरोबर मास्क संबंधीच्या महत्त्वाच्या टिप्स देखील तुम्हाला वाचायला मिळतील.
सध्या N95 आणि सर्जिकल मास्क उपलब्ध आहेत. मात्र N95 आणि सर्जिकल मास्क हे आरोग्य क्षेत्रात काम करणार्या लोकांसाठी आवश्यक असतात. सर्वसामान्य लोकांसाठी घरी बनवलेलं मास्क देखील फायदेशीर ठरवू शकतो.
घरी मास्क बनवण्यासाठी तुम्ही जाड कपड्याचा वापर करू शकता. जर तुम्ही हातरुमालाचा वापर मास्क म्हणून करत असाल, तर त्यासाठी हातरुमाल दोन ते तीन वेळा दुमडणं गरजेचं आहे.
जर तुम्ही सातत्याने हात स्वच्छ ठेवतं असाल तरच मास्क वापरणं फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे मास्क वापरण्याअगोदर तो कसा वापरावा याची माहिती असणं गरजेचं आहे.
मास्क योग्य प्रकारे कसा वापरायचा?
तुमचं तोंड आणि नाक मास्कच्या मदतीने योग्य प्रकारे झाकले जाईल याची काळजी घ्यावी.
मास्क घालत असताना त्याच्या बाहेरच्या बाजूला हात लागणार नाही याची काळजी घ्यावी. कारण त्यावर व्हायरस किंवा बॅक्टेरिया असण्याची शक्यता असते.
मास्क घालायचा अगोदर आणि काढल्यानंतर हात स्वच्छ धुवा. यासाठी साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल सॅनिटायझर वापरू शकता. मात्र मास्क घातलेला असताना तुमचा हात त्याला लागला तरी देखील हात स्वच्छ धुवा.
मास्क योग्य पद्धतीने टाईट करा. तुमचा चेहरा आणि मास्क यात जागा राहणार नाही याची काळजी घ्यावी.
मास्क काढत असताना त्याच्या मागच्या बाजूने काढा. तोंडासमोरच्या भागाला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. कारण तोंडा समोरच्या भागावर व्हायरस असण्याची शक्यता असते.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा तुमचा मास्क इतरांसोबत शेअर करू नका. तुम्ही जरी आजारी नसला तरी तो इतरांसोबत शेअर करू नका.
अशाप्रकारे मास्क वापराविषयीच्या काही महत्त्वाच्या बाबी तुम्ही लक्षात ठेवल्या तर त्याचा वापर प्रभावी ठरेल.