हाताने मैला साफ करणे हे कायद्याने बंधनकारक असले तरी अनेक ठिकाणी बेकायदेशीर रित्या कर्मचाऱ्यांना कडून हे काम करून घेतले जाते.
यावर उपाय म्हणून केंद्र सरकार येत्या पावसाळी अधिवेशनात मॅन्युअल स्कॅवेंजर म्हणून रोजगार प्रतिंबध कायदा आणि त्यांचे पुनर्वसन (सुधारणा) विधेयक २०२०’ हे नवीन विधेयक संसदेत मांडणार आहे.
यातील नियम आणि तरतुदी अगोदरच्या नियमांनुसार अधिक कडक असणार आहेत. जेणेकरून या बेकायदेशीर रित्या काम करून घेतल्या जाणाऱ्या गोष्टींवर आळा बसेल.
‘मॅन्युअल स्कॅवेंजर’ म्हणून रोजगार प्रतिंबध कायदा आणि त्यांचे पुनर्वसन विधेयक २०१३’ नुसार, स्वच्छतागृहं स्वच्छ करणे, त्यांची देखभाल करणे, गटारे व धोकादायक सेप्टिक टाक्यांच्या सफाईसाठी एखाद्या व्यक्तीला कामावर ठेवण्यास प्रतिबंध घालण्यात आला असला तरी याची अंमलबजावणी अनेक ठिकाणे होताना दिसत नाही.