२००७ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने लोकशाहीच्या सिद्धांताला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस’ साजरा करायला सुरुवात केली.
१९८८ मध्ये The International Conference on New and Restored Democracies ची सुरुवात फिलिपीन्सच्या अध्यक्षा कोरॅझोन सी. अॅक्वॅनो यांच्या पुढाकाराने ‘पिपुल्स पॉवर रेवोल्युशन’ने फर्डिनांड मार्कोस यांच्या २० वर्षाच्या हुकुमशाही सत्तेला उखडून फेकलं.
या दिवशी लोक काय करतात?
जगभरात अनेक लोक आणि संस्था (सरकारी आणि बिगरसरकारी संस्था) आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवसाच्या मुहूर्तावर अनेक कार्यक्रम लोकशाहीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करतात. या कार्यक्रमात चर्चासत्रे, परिषद, पत्रकार परिषद, विविध वक्ते, नेते जे लोकशाहीचे समर्थन करतात असे उपक्रम घेतले जातात.
लोकशाही कशी सगळ्या गोष्टींबरोबरच जोडली गेली आहे हे दाखवण्यासाठी पोस्टर्स, फ्लायर्स वगैरे गोष्टी विद्यापीठ, सार्वजनिक इमारती अशा ठिकाणी लावले जातात.
शांती, मानवी हक्क आणि विकास या गोष्टी मिळवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ हे प्रयत्नशील आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की लोकशाही समाजामध्ये मानवी हक्क आणि कायद्याचे नियम हे सुरक्षित राहू शकतात. लोकशाही ही एक मजबूत, सक्रिय आणि चौकस समाजाची निर्मिती करू शकते, असदेखील विश्वास संयुक्त राष्ट्र संघाचा आहे.
२००८ मध्ये पाहिला लोकशाही दिवस साजरा केला केला. याच वर्षी ‘International Conference of New or Restored Democracies’ ला २० वर्ष पूर्ण झाली, ज्यामुळे लोकांना लोकशाहीला प्रोत्साहन देण्याची आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्याची संधी दिली.